'POV' प्रत्येक कवितेचे पान वेगळे

कवितांमधून उलगडत जाणारे, ६ अनोळखी व्यक्तींचे नाटक, ज्यांचे आयुष्यातले अनुभव वेगवेगळे आहेत आणि त्याच्याकडे बघण्याचा दृष्टीकोन ही वेगळा आहे. आणि असा एक दृष्टीकोन घेऊन प्रत्येक जण आपापल्या आयुष्याची वाट चालत आहे. 'POV' - असाच एक काव्यमय प्रवास... ओळखीच्या वाटांवरचा.

'POV' प्रत्येक कवितेचे पान वेगळे
'POV' प्रत्येक कवितेचे पान वेगळे
'POV' प्रत्येक कवितेचे पान वेगळे

'POV' प्रत्येक कवितेचे पान वेगळे
'POV' प्रत्येक कवितेचे पान वेगळे
'POV' प्रत्येक कवितेचे पान वेगळे


'टिली-मिली'

एम. के. सी. एल. नॉलेज फाउंडेशन निर्मित 'टिली-मिली' ह्या, डी. डी. सह्याद्री वाहिनीवर प्रसारित होणाऱ्या शैक्षणिक मालिकेचा भाग होण्याची संधी 'प्रेरणा - एक कलामंच' ला मिळाली आहे.

ह्या वर्षीच्या दुसर्‍या सत्रातील 5 वी ते 8 वी च्या मराठी माध्यमाच्या अभ्यासक्रमावर आधारित 'हसत खेळत आनंददायी शिक्षण' मुले वेगवेगळ्या माध्यमातून घेणार आहेत.

प्रेरणा ची टीम आणि बाल-कुमार कलाकार ह्यात सहभागी झाले आहेत.

'टिली-मिली' ही मालिका 15 मार्च पासून सकाळी 7.30 ते 12.30 ह्या वेळात डी. डी. सह्याद्री वाहिनीवर प्रसारित होणार आहे.

For updates follow our Social Media pages Instagram YouTube Facebook

 
 
 

पाऊसपैंजण

'पाऊसपैंजण'च्या सातही भागांतून तुम्ही काव्यसरी अनुभवू शकता. त्यासाठी खाली दिलेल्या कोणत्याही link वर जाऊ शकता

View on Facebook

View on YouTube


तुमच्या अभिप्रायाची वाट बघत आहोत. धन्यवाद !

Cool घर

We all are going through a different mental phase during this lock-down period. The only thing we have to enjoy is our home. So what does this home mean to us? Let's see.

YouTube Playlist

नाट्यसंस्कार, अभिनय प्रशिक्षण आणि त्याद्वारे साधता येणारा व्यक्तिमत्व विकास यासंबंधी गुणवत्तापूर्ण काम करणारी संस्था म्हणजे 'प्रेरणा - एक कलामंच'

 

स्वाती उपाध्ये

 
 
 
 
 
 

संचालिका 'प्रेरणा - एक कलामंच'

  • नाट्यशास्त्र पदविका (पुणे विद्यापीठ मान्यताप्राप्त)
  • फिल्म मेकिंग प्रमाणपत्र अभ्यासक्रम (MCED)
  • दूरदर्शन मालिकांमधून अभिनय (नसते उद्योग - प्रभात, साईबाबा - ETV, राजा शिवछत्रपती - स्टार प्रवाह इ.)
  • चित्रपटांमधून अभिनय (वळू, बाबू बँडबाजा)
  • डॉ. विजया मेहता संचालित “Magic Moments - Search by a Performer” या कार्यशाळेत सहभाग
सविस्तर वाचा …

'अक्षरवाटा'

 
 
 
 
 
Aksharwata

'अक्षरवाटा' - वाचनाची आवड असणाऱ्या, आवड निर्माण करण्याची इच्छा असणाऱ्या किंवा नुसतं पुस्तकांबद्दल जाणून घेण्याची इच्छा असणाऱ्या 'श्रोत्यांना' हे निमंत्रण. 'प्रेरणा' चा हा उपक्रम नव्या जोमाने पुढे नेत आहोत. वाचन प्रेमाबरोबरच , अभिरुची चे वैविध्य ही या उपक्रमातून अनुभवायला मिळते, जे नक्कीच आनंददायी असते.

आपला सहभाग नोंदवण्यासाठी लगेच संपर्क करावा.

 
 
 
 
 

'प्रतिबिंब - एक स्वच्छंद सुसंवाद'

 
 
 
 
 
प्रतिबिंब एक स्वच्छंद सुसंवाद प्रतिबिंब एक स्वच्छंद सुसंवाद
 
 
 
 
 

ठळक कार्यक्रम

 
 
 
 
 
पु.ल. आजोबा

पु.ल. आजोबा

पु. ल. देशपांडे ह्या बहुरंगी, बहुढंगी व्यक्तिमत्वाच्या साहित्य आणि कलाकृतींवर आधारित रंगमंचीय कार्यक्रम.

संकल्पना व दिग्दर्शन : स्वाती उपाध्ये

कौन बनेगा कचरापती

कौन बनेगा कचरापती

कचाऱ्याच्या समस्येवर निसर्ग आपल्याला विविध प्रकारे सावध करत असतो तसेच मदत करत असतो. निसर्गातल्या प्राणी आणि पक्ष्यांनी ह्या समस्येवर कसे उत्तर शोधले आहे ते ह्या दीर्घांकामधून सादर होते.

लेखन आणि दिग्दर्शन : स्वाती उपाध्ये

आजोबांची  गोष्ट

आजोबांची गोष्ट

निरागस आणि प्रेमळ मुले एका गरीब आजोबांशी कशी मैत्री करतात आणि संकटकाळी त्यांना कशी मदत करतात त्याची ही हळुवार कहाणी.

लेखन आणि दिग्दर्शन : स्वाती उपाध्ये

G1WW

G1WW

जलसंवर्धनाचे महत्व विषद करणारा दीर्घांक

लेखन आणि दिग्दर्शन : स्वाती उपाध्ये


या संस्थेत नाट्यप्रशिक्षण व रंगभूमी माध्यमाद्वारे व्यक्तिमत्व विकासासाठी वेगवेगळ्या क्षेत्रातील विद्यार्थी, शिक्षक, व्यावसायिक, नोकरदार व्यक्तींसाठी अल्पमुदतींच्या कार्यशाळा घेतल्या जातात.