संस्थेविषयी ...
संवेदनशील मनांची
एक कलामंच
नाट्यसंस्कार, अभिनय, प्रशिक्षण आणि त्याद्वारे साधता येणारा व्यक्तिमत्व विकास यासंबंधी २००६ पासून सातत्याने आणि गुणवत्तापूर्ण असे काम करणारी 'प्रेरणा -एक कलामंच' ही आघाडीची संस्था आहे.
रंगमंचावर कुठल्याही प्रकारचे सादरीकरण करण्यासाठी नाट्य विषयक कलागुणांबरोबरच इतरही काही गुणांची ओळख होणे आवश्यक असते. 'नाट्यसंस्कार ' हे असे माध्यम आहे की ज्यामधून विकसित होत जाणारे गुण, हे फक्त रंगमंचीय सादरीकरणासाठीच उपयुक्त नसून वैयक्तिक आयुष्यातही त्या गुणांचा फायदा होऊ शकतो. नाट्यसंस्कारात फक्त 'नाट्य' ह्या एकाच शब्दाला महत्व न देता 'संस्कार' ह्या शब्दालाही आम्ही जास्त महत्व देतो.
'प्रेरणा' च्या कार्यशाळा हीच उद्दिष्टे डोळ्यासमोर ठेऊन आयोजित केल्या जातात. या कार्यशाळांमधून अभिनयाबरोबरच नाटकाच्या इतरही तांत्रिक आणि सर्जनशील अंगांची उदा. प्रकाश योजना, संगीत संयोजन, नेपथ्य, रंगमंच व्यवस्था, लेखन, दिग्दर्शन इत्यादी ची ओळख होते.
नाट्य कार्यशाळेबद्दल सविस्तर वाचा …
संचालिकेविषयी ...
स्वाती उपाध्ये
संचालिका 'प्रेरणा - एक कलामंच'
- स्थापत्य अभियांत्रिकी पदविका
- नाट्यशास्त्र पदविका (पुणे विद्यापीठ मान्यताप्राप्त)
- Film Making Certificate (MCED)
- Neuro Linguistic Programming Trainer
- Advance Life Coach
- व्यावसायिक आणि प्रायोगिक रंगभूमीवर अभिनय, दिग्दर्शन आणि लेखन . वैयक्तिक आणि सांघिक पुरस्कार प्राप्त.
- लघुपट, दूरदर्शन मालिका आणि चित्रपटांमधून अभिनय आणि दिग्दर्शन सहाय्य.
- 'प्रेरणा - एक कलामंच' ही संस्था स्थापन करून 'रंगभूमीच्या माध्यमातून कौशल्य विकसन' ह्या संबंधी कार्यशाळा, प्रशिक्षण आणि व्याख्याने.
- बालरंगभूमी साठी नाट्यलेखन, दिग्दर्शन आणि प्रशिक्षण
- 'प्रतिबिंब ' ही 'स्व-ओळख' कार्यशाळा, सर्व वयोगटांसाठी
- अनेक संस्था, संघटना आणि शाळांबरोबर नाट्यकला , कौशल्य विकसन आणि स्व-ओळख ह्या विषयावर काम
- वैयक्तिक आणि सांघिक समुपदेशन
- एम. के. सी. एल. निर्मित 'टिली - मिली' ह्या दूरदर्शन मालिकेतील १९२ भागांचे नाट्यदिग्दर्शन. 'हसत खेळत आनंददायी शिक्षण' ह्या संकल्पनेवर आधारित ह्या मालिकेत महत्वपूर्ण योगदान.
- Neuro Linguistic Programming आणि Life Skills विषयांवर नियमित प्रशिक्षण / कार्यशाळा चालू आहेत.
आमची टीम
प्रेरणा परिवार
'प्रेरणा'च्या सर्व उपक्रमांमध्ये आमचा सुजाण पालक वर्ग, शिबिरार्थींचे कुटुंबीय सक्रिय सहभागी असतात. किंबहुना त्यामुळेच सातत्याने, नाविन्यपूर्ण व गुणवत्तापूर्ण उपक्रम राबवण्यासाठी आणि नाट्यप्रशिक्षणाबरोबरच व्यक्तिमत्व विकासाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आम्हाला सदैव 'प्रेरणा' मिळत असते.
नाविन्याची धरलेली कास आणि अव्याहतपणे मनात असलेला ध्यास ह्याबरोबरच सर्व हितचिंतकांच्या शुभेच्छा
या बळावर आम्ही या मार्गावर निश्चितच यशस्वी होऊ!